लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सराकरकडून धडाकेबाज अनोखा निर्णय घेण्यात आला आहे . सध्या देशांमध्ये सुशिक्षित लोकांचे प्रमाण वाढुनही भ्रष्टाचाराला आळा बसला जात नाही . आपले काम कोणत्याही अडथळा शिवाय पुर्ण व्हावे , याकरीता कर्मचारी / अधिकाऱ्यांची इच्छा नसताना देखिल पैसांची लालच दिली जाते , यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला जात नाही .
यामुळे सरकारी कर्मचारी / अधिकारी हा जनेतेच्या आणि सरकारच्या नजरेमध्ये भ्रष्ट गणला जात आहे . यामुळे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत धडाकेबाज अनोखा निर्णय घेतला आहे .उत्तर प्रदेश राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे कि , अधिकारी / कर्मचाऱ्यांने आपली संपत्ती जाहीर करा अन्यथा पदोन्नती विसरा असा अनोखा निर्णय जाहीर केला आहे .
या संदर्भात उत्तर प्रदेश राज्याचे मा.मुख्य सचिव श्री.दुर्गा शंकर मिश्र यांनी अधिकृत्त आदेश पारित केला आहे . सदर आदेशांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांने आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे . जो अधिकारी / कर्मचारी सदर आदेशाचे पालन करणार नाही अशा कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
उत्तर प्रदेशांमधील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना मानव संपदा या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 31.12.2023 पर्यंत आपल्या संपत्तीचा संपुर्ण तपशिल नोंदवावा लागणार आहे .जे अधिकारी / कर्मचारी आपल्या संपत्तीची नोंद करणार नाहीत / खोटी नोंद करतील अशा कर्मचाऱ्यांचे पदोन्नती ( प्रमोशन ) रोखण्यात येणार असल्याने अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .
या निर्णयांमुळे भ्रष्टाचारास आळा बसेल असे उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून नमुद करण्यात आले आहेत .असे असले तरी भ्रष्टाचार हा वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात जास्त होत असतो , ते सामान्य जनतेला माहित देखिल होत नाही .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !