Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee 13 types allowance increase news ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 50 टक्के पर्यंत वाढ केल्यानंतर , इतर 13 भत्यांमध्ये आपोआप वाढ झालेली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण पगारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे . कोणत्या भत्यांमध्ये वाढ झाली ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्के वाढ केल्याच्या नंतर प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार तसेच निवृत्तीवेतनांमध्ये थेट वाढ झाली , त्यानंतर दुर्गम भागांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये 25 टक्यांनी वाढ लागु करण्यात येणार आहेत , जे कि सातव्या वेतन आयोगांमध्ये नियोजि आहे . सदर दुर्गम भत्यांची विभागणी ही 3 भागांमध्ये करण्यात येते .
याशिवाय सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाई भत्ता हा 50 टक्केचा आकडा पार केल्याच्या नंतर घरभाडे भत्तांमध्ये वाढ नियोजित आहे , यापुर्वी डी.ए चा दर हा 25 टक्क्यांचा आकडा पार केल्याच्या नंतर घरभाडे भत्तांमध्ये वाढ करण्यात आली होती , आता पुन्हा घरभाडे भत्तामध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे .
याशिवाय केंद्रीय महिला दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता , शिक्षण भत्ता , पाल्यांना मिळणारा भत्ता , घरभाडे भत्ता , ड्युटी भत्ता , गणवेश भत्ता , प्रतिनियुक्ती भत्ता , वाहन भत्ता ,एनपीएस मधील सरकारचे योगदान , अशा भत्यांमध्ये 25 टक्यांनी वाढ झालेली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे .
आठवा वेतन आयोगाचा प्रस्ताव : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करण्याच्या आनुषंगाने या वर्षी आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.