राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचा ताण – तणाव कमी करण्यासाठी मिळते 10 दिवसांची रजा ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government decision on leave for Vipassana camp ] : विपश्यना रिसर्च इन्स्टिट्युट ,धम्मगिरी ,इगतपुरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत राज्यातील केंद्रात विपश्यना हे 10 दिवसांचे शिबिर घेण्यात येते . अशा प्रशिक्षण केंद्रात भाग घेण्याची यापुर्वी वित्त विभागाच्या दिनांक 21.07.1998 रोजीच्या निर्णयानुसार केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांना अनुज्ञेय होती .

तर याची व्याप्ती वाढवून वित्त विभागाच्या दिनांक 27 जुन 2023 रोजीच्या निर्णयानुसार सर्व राज्‍य शासकीय कर्मचाऱ्यांना लागु करण्याचा प्रश्न शासनांच्या विचाराधीन होता , या निर्णयानुसार विपश्यना रिसर्च इन्स्टिट्युट धम्मगिरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत राज्यातील प्रशिक्षण केंद्रात विपश्यना च्या 10 दिवसांच्या शिबिरात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल .

तसेच प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे अशा कर्मचाऱ्यांने मागणी केल्यास त्यांस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता एकावेळी कमाल 14 दिवस इतकी परिवर्तीत रजा मंजूर करता येणार आहे .

तवर प्रयोजनाकरीता परिवर्तित रजा आवश्यकतेनुसार , तीन वर्षातुन एकदा तर संपुर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल 6 वेळा याप्रमाणे सदर रजा अनुज्ञेय करता येते . तर सदर सवलत हक्क म्हणून मागता येणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment