Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Google pay launch google wallet ] : गुगल कंपनीकडून गुगल पे मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून , हे नवीन फीचर्स नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे . यामुळे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधांचा फायदा होणार आहे .  चला तर मग जाणून घेऊयात गुगल कंपनीकडून करण्यात आलेला महत्वपूर्ण बदल .

गुगल वॉलेट व गुगल पे यामध्ये फरक असणार आहे , गुगल पे पेमेंट करण्यासाठी वापर होईल . तर गुगल वॉलेट हे क्रेडिट कार्ड,  डेबिट कार्ड ,गिफ्ट कार्ड साठवणूक करण्यासाठी वापर केला जाणार आहे.  या वॉलेटच्या माध्यमातून गुगल कंपनीकडून जगातील 20 ब्रँड सोबत करार करण्यात आला आहे . यामध्ये प्रामुख्याने इंडिगो, इंडिया कार्ड ,एअर इंडिया ,फ्लिपकार्ट ,कोची ट्रेन ,आयकॉन ,पीव्हीआर अशा 20 ब्रँड सोबत करार करण्यात आला आहे .

या गुगल वरच्या माध्यमातून ग्राहकांना चित्रपट पाहणे प्रवास करणे गिफ्ट कार्डचा फायदा होणार आहे सुरुवातीला गुगल वॉलेटच्या माध्यमातून अनेक गिफ्ट डिस्काउंट दिले जाणार आहे ज्यामुळे अधिकाधिक ग्राहक गुगल वॉलेट कडे वळतील गुगलच्या माध्यमातून सर्व प्रकारचे बिल पेमेंट पैसे पाठवणे अशा प्रकारचे व्यवहार करू शकता

तर गुगल वॉलेटच्या माध्यमातून केवळ प्रवास करणे, चित्रपट पाहणे ,शॉपिंग करणे अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. ज्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे डिस्काउंट ,कार्डचा फायदा घेता येईल . गुगल पे चा वापर भारतासह 79 देशांमध्ये  केला जातो ,  अशा 79 देशांमध्ये गुगल वॉलेट लॉन्च करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *