Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Google Pay Stop Working Séance 4 June news ] : दिनांक 04 जुन 2024 पासून गुगल पे बंद होणर असल्याची आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे . गुगल कंपनीकडून या गुगल पे या पेमेंट ॲप्सची सेवा बंद केली जाणार आहे , परंतु ही केवळ काही देशापुरती खंडीत असणार आहे . बाकी देशांमध्ये याचा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहेत .
गुगल पे चा वापर सर्वात जास्त भारत ,सिंगापुर त्याचबरोबर अमेरिकेमध्ये करण्यात येतो . या ॲपमध्ये आता गुगल कंपनीकडून मोठा बदल करण्यात येणार असल्याने , अमेरिकेमध्ये प्रथमत : गुगल पे ची सुविधा तात्पुरती बंद करण्यात येईल व ॲप्समध्ये बदल करण्यात येतील . यावेळी भारत व सिंगापुर मध्ये गुगल पे सुरळीत चालु असेल , अशी माहिती गुगल कंपनीकडून देण्यात आलेली आहे .
गुगल पेची होम स्क्रिनवर दिसणारी आवृत्ती ही जूनी आवृत्ती आहे , ज्या आकृत्तीचा वार पेमेंट व फायनान्स साठी करण्यात येतो .यामुळे आता गुगल पे कंपनीकडून पेमेंट ॲप बंद राहणार असल्याने , गुगल वॉलेट वापरण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात आलेला आहे .
गुगल पे कडून नविन फिचर्स येण्याची शक्यता : गुगल पे कंपनीमार्फत आता नविन सुविधा वापरकर्त्यांसाठी येण्याची शक्यता आहे , जसे कि लोन सुविधा , तांत्रिक अडचणीपासून सुरक्षा इ.गोष्टींचा विचार करॅन नविन गुगल पे लाँच करण्यात येणार आहेत . जे कि प्रथम अमेरिकामध्ये लाँच केला जाईल , त्यानंतर भारतास इतर देशांमध्ये लाँच केला जाईल .
यामुळे येत्या 4 जुन 2024 पासुन गुगल पे ची अमेरिका मधील सुविधा बंद असेल , तर भारतामधील वापकर्त्यांना कोणतीही अडचणी येणार नसल्याचे स्पष्टीकरण गुगल कंपनीकडून देण्यात आलेले आहेत .