Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Google Pay , Phone Pay Paytme Apps Payment Transaction New Update News ] : भारतामध्ये पेमेंट ॲप्सच्या व्यवहाराबाबत दिनांक 01 जानेवारी 2024 पासून पाच महत्वपुर्ण बदल झालेले आहेत . यांमध्ये कोणत्याही ॲप्सद्वारे युपीआय माध्यमातुन करण्यात येणाऱ्या व्यवहाराबाबत , मोठे बदल करण्यात आलेले आहेत . ते पुढीप्रमाणे पाहुयात ..
2000 रुपये पेक्षा जास्त पेमेंट थांबवता येणार : यापुढे युपीआयच्या माध्यमातुन फोन पे , गुगलपे , पेटीम , भीम अशा युपीआय माध्यमातुन नविन नंबरवर रुपये 2,000/- रुपये पेक्षा अधिक रक्कम बाबतचा व्यवहार हे चार तासानंतर पुर्ण होणार आहे , तर पैसे सेंड करणाऱ्या व्यक्तीला चार तासांमध्ये पेमेंट थांबवता येणार आहे आणि रक्कमेमध्ये देखिल बदल करता येणार आहे . याकरीता आपल्याला ऑपशन देखिल देण्यात येणार आहेत .
दैनिक पेमेंट : NPCI ने दिनांक 01 जानेवारी 2024 पासून दैनंदिन वापराच्या रक्कम देखिल वाढ करण्यात आलेली असून , एक लाख रुपयांपर्यंतच्या दैनिक पेमेंट हे 24 तासांत करता येणार आहेत .
UPI द्वारे 5 लाख रुपये पर्यंत पैसे पाठवता येणार : आता नविन वर्षांच्या सुरुवातीपासून एका दिवसांमध्ये 05 लाख रुपये पर्यंत पैसे पाठविता येणार आहेत , हा नियम दवाखाने व शैक्षणिक संस्थांना पैसे पाठविताना लागु असणार आहे . यापुर्वी एका दिवसांमध्ये 01 लाख रुपयेच सेंड करता येत होते , या नियमांमुळे आता 5 लाख रुपये पर्यंत पैसे सेंड करता येणार आहेत .
युपीआय द्वारे मिळणार 45 दिवसांपर्यंत कर्ज : आता यापुढे UPI NOW या ऑप्शनच्या माध्यमातुन आता खात्यांमध्ये पैसे नसले तरी देखिल 45 दिवसांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज उपलब्ध होणार आहेत .45 दिवसानंतर क्रेडिट कार्ड सारखे व्याज लागणार आहेत .
विमा / एसआयपी / इतर बँकिंग पेमेंट करता मर्यादा वाढविली : यापुर्वी युपीआयच्या माध्यमातुन , विमा प्रिमीयम , एसआयपी , विमा प्रिमियम तसेच इतर बँकिंग पेमेंट करण्याची मर्यादा यापुर्वी 15,000/- रुपये ऐवढी होती , आता ही मर्यादा 01 लाख रुपये पर्यंत करण्यात आल्याने युपीआय वार कर्त्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे .