Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचे वेध लागले असून , सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावास आता लवकरच मंत्रीमंडळाची मंजुरी प्राप्त होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री तसेच दसरा सणाच्या अगोदरच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळणार आहे .
मंत्रीमंडळ बैठक : दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पासून केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक संपन्न होणर आहे . यांमध्ये वित्त मंत्रालयांकडून डी.ए वाढीबाबतच्या प्रस्ताव सादर करण्यात येईल . जेणेकरुन मंत्रीमंडळ बैठकीमध्ये डी.ए वाढीच्या प्रस्तावावर चर्चा करुन महागाई भत्ता ( DA ) वाढीस कॅबिनेट मंत्रीमंडळाची मंजुरीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल .
महागाई भत्ता मध्ये 3 टक्के / 4 टक्के वाढ होणार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 3 टक्के कि , 4 टक्के वाढ होणार याकडे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे लक्ष वेधले आहेत . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे , 3.50 टक्के पेक्षा अधिक म्हणजेच 4 टक्के डी.ए मिळणे अपेक्षित आहे , परंतु महागाई भत्ता 3 टक्के की , 4 टक्के मिळेल . हे मंत्रीमंडळ निर्णयानंतरच समजणार आहे .
नवरात्री / दसरा सणाच्या पार्श्वभुमीवर मिळणार डी.ए वाढीचा लाभ : या महिन्यांत दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रोजी नवरात्री सण आहे , तर दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 रोजी दसरा सण आहे . या सणांचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून महागाई भत्तामध्ये वाढ करण्याची दाट शक्यता मिडिया रिपोर्टनुसार वर्तविली जात आहे .
एकुण महागाई भत्ता जाणार 45 टक्के पार : सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के प्रमाणे डी.ए लाभ मिळत आहेत , तर आता पुन्हा एकदा जुलै 2023 मध्ये 3 टक्के वाढ झाल्यास , एकुण डी.ए हा 45 टक्के होईल तर 4 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास , एकूण महागाई भत्ता हा 46 टक्के होणार आहे .
सदर महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्र सरकारच्या अधिनस्थ तब्बल 47 लाख सरकारी कर्मचारीत तसेच 68 लाख पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे .केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत निर्णय घेण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.