Spread the love

लाईव्ह मराठी पेपर : संगिता पवार , देशातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे मोदी सरकारकडून , तब्बल तीन वर्षांनंतर घरभाडे भत्तामध्ये चक्क दुपटीने वाढ करण्याचा मोठा दिलासादायक निर्णय घेतला जाणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता येणार आहे .

मिडीया रिपोर्ट अहवालानुसार , घरभाडे भत्तामध्ये एकुण 3 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागांमध्ये 9 टक्के , नागरी / शहरी भागांमध्ये 18 टक्के तर महानगर भागांमध्ये 27 टक्के घरभाडे मुळ वेतनाच्या प्रमाणात दिला जातो . यांमध्ये आता आणखीण तीन टक्क्यांची भर केंद्र सरकारकडून टाकली जाणार असल्याने , एकुण वेतनात भर होईल .

तीन टक्के वाढ म्हणजे , ग्रामीण भागातील वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के तर नागरी / शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 टक्के वरुन 20 टक्के HRA  तर , महानगर भागांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 27 टक्के वरुन 30 टक्के HRA केले जाणार आहे . म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणानुसार क्रमाने 1 टक्के / 2 टक्के / 3 टक्के अशी वाढ होईल .

हे पण वाचा : न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात नविन शासन परिपत्रक निर्गमित !

HRA मधील वाढ कधीपासून लागु होणार ?  :  केंद्र शासनाच्या सन 2016 च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार , महागाई भत्ता मधील वाढ नुसार वेळोवेळी घरभाडे भत्तांमध्ये वाढ निश्चित केले जाईल असे नमुद करण्यात आलेले आहे . यामुळे सन 2021 मध्ये घरभाडे भत्ता हा 25 टक्के झाला असता HRA मध्ये सुधारणा करण्यात आली तर आता डी.ए दर हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल त्या वेळी वरीलप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तांमध्ये वाढ निश्चित केली जाणार आहे .

सध्या माहे जुन 2023 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे टक्के लागु आहे तर माहे जुलै मध्ये तीन किंवा टक्के डी.ए वाढ करण्यात येणार आहे , यामुहे एकुण डी.ए हा 46 टक्के होईल . तर पुन्हा जानेवारी 2024 मध्ये 5 टक्के वाढ लागु केल्यास एकुण डी.ए हा 50 टक्के क्रॉस करेल त्यामुळे माहे जानेवारी 2024 मध्ये डी.ए मध्ये सुधारणा करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .

हे पण वाचा : जुनी पेन्शनच्या मागणीकरीता ,राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी जाणार , पुन्हा एकदा राज्यव्यापी संपावर ..

कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार , HRA अदा करण्यासाठी X,Y,Z अशी श्रेणी मध्ये वर्गिकरण करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *