Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee PF Intrest Rate Increase ] : देशांमध्ये दिनांक 16 एप्रिल ही सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे ,यामुळे निवडणुकांपुर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे .
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने भविष्य निर्वाह निधी ( GPF ) मधील संचित निधीवरील व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता , सदर शिफारशीस केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून ( CBT ) कडुन केंद्रीय अर्थमंत्रालयास सादर करण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रक्कमेवर सन 2023-24 या आर्थकि वर्षात 8.25 टक्के इतका व्याजदर प्राप्त होणार आहे .
यापुर्वी मागील तीन वर्षांमध्ये भविष्य निर्वाह निधी ( पीएफ ) खात्यामधील जमा निधीवर सन 2019-20 पासुन 8.50 टक्के व्याजदर देण्यात येत होते , हे व्याजदर सन 2020-2021 पर्यंत कायम ठेवण्यात आलेले होते . केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारच्या दिवशी केंद्रीय विश्वस्त मंडळ च्या 235 व्या बैठकीमध्ये सन 2023-24 करीता व्याजदर मध्ये ( Intrest Rate ) वाढ करणेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या संदर्भातील शिफारस आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे . केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजूरीनंतर कर्मचाऱ्यांना वरील नमुद वाढीव व्याजदरानुसार व्याज सदस्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल , असे निवदनांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . हा व्याजदर मागील 03 वर्षातील सर्वात उच्चांकी दर असल्याचे दिसून येते .
या वाढीव व्याजदराच्या निर्णयामुळे केंद्रीय विश्वस्त मंडळाने एकुण 13 लाख कोटी रुपयांच्या मुळ रकमेवर देशातील तब्बल 8 कोटी सदस्यांना व्याजाची रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.