Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ gold price reduce see reason ] : सोन्याचे भावामध्ये मागील 03 महिन्यांपासुन चढ पाहायला मिळाली आहे , तर याउलट शेअर मार्केट 03 महिन्यांपासुन क्रॅश होताना दिसून आला आहे . तर आता सोन्याच्या भावामध्ये घसरण होताना दिसून येत आहे , तर शेअर मार्केट मध्ये तेजी येताना दिसून येत आहे .
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याच्या नंतर भारताच्या फ्युचर्स बाजारात सोन्याचे भाव हे 1850/- रुपयांनी घसरला आहे . तर दुसरीकडे चांदीच्या भावामध्ये दखिल घसरण दिसून येत आहे . यामुळे आता सोने खरेदी दारांसाठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे .सोन्याचे भाव घसरण्याच्या काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
शेअर मार्केट व सोन्याचा विरोधी ताळमेळ : शेअर मार्केट व सोन्याचे भाव नेहमी विरोधी पातळीवर काम करत असते . ज्या वेळी शेअर मार्केट तेजीत असते , त्यावेळी सोन्याचे भाव स्थिर रहाते , तर ज्यावेळी सोन्याचे भाव वाढत असते , त्यावेळी शेअर मार्केट कोसळत असते . म्हणजेच गुंतवणुक दार हे शेअर मार्केट मधील गुंतवणू काढून सोन्यांमध्ये करत असतात . आता मागील 03 महिन्यांच्या शेअर मार्केट क्रॅश नंतर आता तेजी येत असल्याने गुंतवणुकदार सोन्यातील प्रॉफिट बुक करुन शेअर मार्केट मध्ये गुंतवणु करत आहेत .
मागणी कमी : सोन्याचा आयात करणारा सर्वात मोठी देश हा भारत आहे , तर अशा देशांमध्ये सोन्याच्या भाव वाढीमुळे स्थानिक पातळीवरुन मागणी कमी येत असल्याने , सोन्याच्या किंमती घट होवू शकते . कारण वस्तुची किंमत ही मागणी देखिल अवलंबून असते .
याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय , डॉलर निर्देशांकात घसरण , फेड रिझर्व्हच्या बैठकीपुर्वी अस्थिरता या बाबींमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये परत घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सोन्याचे भाव हे 73 ते 75 हजार पर्यंत घसरु शकते .