घरेलु कामगार व बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आर्थिक सहाय्य योजना !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Gharelu Worker & Bandhakam Worker Yojana ] : घरेलु कामगार तसेच बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी राज्य शासनांकडून आर्थिक सहाय्य करणेबाबत योजना राबविण्यात येते ,या संदर्भात योजनांची पात्रता , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तर पणे पाहुयात ..

घरेलु कामगारांसाठी कल्याण योजना : घरेलु कामगारांच्या कल्याणासाठी घरेलु कामगार मंडळ मार्फत प्रसुती प्रकरण दोन अपत्यापर्यंत प्रत्येकी 5,000/- रुपये आर्थिक लाभ दिला जातो , तसेच सन्मानधन लाभ म्हणून नोंदणीकृत कामगारांना वयाच्या 55 वर्षानंतर प्रत्येकी 10,000/- रुपयांचा लाभ दिला जातो , सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा घरेलु कामगार कल्याण मंडळ कार्यालयांमध्ये अथवा mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या .

बांधकाम कामगार योजना : कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना सामाजिक / आरोग्यविषय सुविधांसाठी आर्थिक लाभ दिले जाते , यांमध्ये सामाजिक सुरक्षांमध्ये विवाहाच्या खर्चाची प्रतिपुर्ती करीता 30,000/- रुपये तर मध्यान्ह भोजन – कामाच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक आहाराचा लाभ दिला जातो , तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविण्यात येते .तसेच व्यक्तिमत्वविकास पुसतक संचाचे वाटप , अवजारे खरेदी करीता 5,000/- रुपये मदत दिली जाते .

आरोग्यविषय लाभ : नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- व शस्त्रक्रिया द्वारे प्रसतीकरीता 20,000/- रुपये लाभ दिला जातो , तर गंभीर आजाराच्या उपचार्थ 100,000/- रुपये तर 75 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास , 2,00,000/- रुपये तर व्यसनमुक्ती केंद्रातील उपचाराकरीता 6,000/- रुपये इतके आर्थिक लाभ दिले जाते .

शैक्षणिक लाभ : नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांकरीता इयत्ता 1 ली ते 7 वी  पर्यंत प्रतिवर्ष 2500/- रुपये तर इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंत प्रतिवर्ष 5,000/- रुपये तर इयत्ता 10 वी ते 12 वी मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- लाभ प्राप्त होईल , तर इयत्ता 11 वी व 12 वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10,000/- रुपये तर पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्षी 20,000/- लाभ दिला जातो .

तर वैद्यकीय शिक्षणाकरीता प्रतिवर्ष 1,00,000/- तर अभियांत्रिकी शिक्षणाकरीता 60,000/- रुपये तर शासनमान्य पदविकासाठी 20,000/- रुपये तर पदव्युत्तर पदवी करीता 25,000/- रुपये लाभ दिला जातो .

अर्ज कसा कराल : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयांमध्ये संपर्क साधावा , अथवा https://mahabocw.in/mr/ या संकेतस्थळाला भेट द्या .

Leave a Comment