Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ gharelu kamagar yojana ] : राज्य शासनांकडून नव्याने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनांस चांगलाचा प्रतिसाद मिळत आहेत , तर यातच ज्या महिला घरकाम करतात त्यांच्यासाठी तब्बल 10,000/- रुपये लाभ कामगार मंत्रालयाकडुन दिले जाणार आहेत .
राज्यातील सर्व महिलांचा ओढ आता लाडकी बहीण योजनांकडे लागले आहेत , परंतु घरेलु कामगारांना दरवर्षी 10 हजार रुपये इतके आर्थिक लाभ पात्र महिलांच्या खात्यांमध्ये अदा केले जाते .राज्यांमध्ये घरेलु काम / मोलकरणी सारखे काम करणाऱ्यांना आर्थिक जिवनमान उंचवता यावेत , याकरीता वर्षाला 10 हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिले जाते .
महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ तर्फे राज्यातील घरेलु कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्याच्या घरेलु कामगार कल्याण मंडळ मार्फत प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पुर्ण करण्यात आलेल्या जिवित नोंदणी असणाऱ्या पात्र घरेलु कामगार यांना राज्य घरेलु कामगार कलयाण मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये 10,000/- एवढी रक्कम पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डिबीटीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे . पात्रता / अटी व शर्ती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.सदर घरेलु सन्मानधन योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला असेल असे सदर योजना अंतर्गत पात्र घेण्यास पात्र नसतील . तसेच लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापुर्वी सदर लाभार्थी जिवित नोंदणीकृत तसेच पात्र असल्या बाबत विकास आयुक्त ( असंघटित कामगार ) कार्यालयाने खात्री करुन घेण्याचे निर्देश आहेत .
02.अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकानामधून कामगार आयुक्त तसेच सदस्य सचिव म.घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याचे निर्देश आहेत . त्याचबरोबर सदर अधिनियमांच्या कलम 15(3) मधील तरतुद सर्व जिल्हास्तरावील कार्यालय प्रमुखांना देखिल तंतोतंत लागु असणार आहेत , असा उल्लेख करण्याचे निर्देश आहेत .
03.सदरच्या अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातुन तसेच लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातुन कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखा मार्फत अर्थसहाय्य वाटप करण्याचे निर्देश आहेत .
04.तसेच महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ या प्रयोजन करीता प्रत्येक जिल्हा स्तरावरचे नियंत्रणक व समन्वयन विकास आयुक्त ( असंघटित कामगार ) यांना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..