Gas Cylinder Price Reduced : केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व गृहिणींना रक्षाबंधनची मोठी भेट दिली असून आता घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडर ची किंमत कमी केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आणि खास करून महिला वर्गाला याचा दिलासा मिळाला आहे. 30 ऑगस्ट पासूनच म्हणजे रक्षाबंधन सुरू झाल्यापासून हा नियम लागू होणार आहे. आता यामध्ये शासन उज्वला योजनेअंतर्गत 75 लाख नवीन सिलेंडर मोफत जोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांसमोर असे वक्तव्य केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा अंतर्गत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठमोठे निर्णय घेण्यात आले (gas cylinder subsidy amount). यामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ही तब्बल दोनशे रुपये आणि स्वस्त केली आहे. असा मोठा निर्णय त्याठिकाणी घेतला. यासोबतच उज्वला योजनेच्या लाभार्थी व्यक्तींना आता एकूण चारशे रुपये गॅस सबसिडी मिळणार आहे. कारण आधी दोनशे रुपयांच्या सबसिडीचा लाभ घेत असून परिणामी लाभार्थी व्यक्तीस सिलेंडर फक्त सातशे रुपयात मिळू शकतो.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदाच्या पिक विम्याची रक्कम मिळणार मोठी; पहा शासन निर्णय;
कोरोना महामारीच्या काळामुळे जून 2020 मध्ये गॅस सिलिंडर वर दिली जाणारी सबसिडी ही पूर्णपणे बंद करण्यात आली होती (gas cylinder news). कमीत कमी भरपाई बाबत अशा वेळी कोणतीही स्पष्टीकरण देण्यात आली नाही आणि सार्वजनिक इंधनक्षेत्रात व पेट्रोलियम कंपनी या बुधवारपासून किमती कमी करतील असा अंदाज आहे. त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून यासाठीची जी काही भरपाई असेल ती प्रदान केली जाईल.
Gas Cylinder Price Reduced : प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे तरी या निर्णयाचा परिणाम प्रशासनाच्या तिजोरीवर किती होईल याची आकडेवारी अजून निश्चित नाही. या प्रकरणाबाबत ठाकूर यांनी असे सांगितले आहे की, उज्वला योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना एलपीजी सिलेंडर साठी प्रति सिलेंडर 200 रुपये इतकी सबसिडी देण्यात येणार असून आर्थिक वर्षांमध्ये ही सर्व रक्कम मिळून 7000 कोटी रुपये इतकी असेल (gas cylinder price). यामध्ये उज्वला गॅस सिलेंडरचे लाभार्थी हे नऊ कोटी इतके आहेत. तर 31 कोटी ग्राहक घरगुती स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वापरत आहेत.