Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Gas Cylinder Price Reduce News ] : दिनांक 01 जुन 2024 पासुन गॅस सिलेंडर ( LPG ) किंमतीमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे , यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे . याबाब इंडियन ऑईन कंपनीच्या अधिकृत्त संकेतस्थळावरुन सदर नविन सुधारित दर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .
सदरचा बदल हा 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत करण्यात आलेला आहे , यांमध्ये 01 जुन पासून दिल्लीत 69.50 रुपये , चेन्नईमध्ये 70.50/- रुपये , मुंबई मध्ये 69.50/- रुपये तर कोलकाता मध्ये 72/- रुपयांनी सदर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आलेली आहे . तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकरचा बदल करण्यात आलेला नाही .
असे असतील व्यावसायिक सिलेंडरचे नवीन दर : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अधिकृत्त संकेतस्थळावरुन प्रसिद्ध झालेल्या अपडेट नुसार , दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर ( 19 KG ) ची किंमत आता 1745.50/- रुपये ऐवजी 1676/- रुपये अशी असणार आहे .तर कोलकाता मध्ये सदर सिलेंडरची किंमत हि 1787/- रुपये तर मुंबई मध्ये 1629/- रुपये तर चेन्नईमध्ये 1840.50/- रुपये अशी सुधारित दर असणार आहेत .
घरगुती गॅस सिलेंडरचे दर असे असतील : घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही , सदर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती मुंबई मध्ये 802.50/- रुपये इतकी आहे .यापुर्वी महिला दिनानिमित्त सदर गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आलेली होती , त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ह्या स्थिर आहेत .
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात केल्याने , हॉटेल / रेस्टॉरंट तसेच किरकोळ व्यवसायिकांसाठी फायदा होणार आहे , तर यामुळे हॉटेल मधील खाण्यांचे पदार्थ स्वस्त होण्यास मदत होईल .