Spread the love

Free Silai Machine Yojana Maharashtra 2023 : नमस्कार आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून खास महिलांसाठी खुशखबर घेऊन आलो आहोत. प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशभरातील काही पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून कोण कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल? या योजनेचे वैशिष्ट्य व उद्दिष्ट काय? योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबींविषयी तपशीलवार माहिती आपण आज जाणून घेऊया.

केंद्र सरकारने राबवलेल्या पीएम फ्री शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विभागातील यासोबतच शहरी विभागातील ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत शिलाई मशीन मिळेल (Free Silai Machine Yojana online registration). प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यांमध्ये तब्बल पन्नास हजार पेक्षा अधिक महिलांना अगदी फ्री शिलाई मशीन मिळणार आहे. शिलाई मशीन व्यवसाय मधून जास्तीत जास्त महिलांनी आपला उदरनिर्वाह चालवावा आणि कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्यारक्षण करावी यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. 20 ते 40 वयोगटातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहे.

Bank Rules : बँक आपल्याकडून चेकच्या मागच्या बाजूस सही का घेते? तुम्हाला माहित होते का? जाणून घ्या सविस्तर;

फ्री शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता;

१) महिला या योजनेचा लाभ घेण्याकरिता उत्सुक आहेत त्या अर्जदार महिलेचे वय कमीत कमी 20 वर्षे असावे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.

२) अर्ज करणाऱ्या महिलेच्या पतीचे प्रत्येक वर्षाचे उत्पन्न हे 12 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे (Free Silai Machine Yojana 2023 last date).

३) देशभरातील अपंग व विधवा महिला सुद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील आणि योजनेचा लाभ घेऊन सक्षम व स्वावलंबी बनू शकतील.

Investment Tips : फक्त 10 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवू शकते करोडपती! पहा गुंतवणुकीची भन्नाट टीप;

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे;

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचे प्रमाणपत्र, अपंग घासल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र, सामुदाय प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो, इत्यादी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया (Free Silai Machine Yojana apply online);

१) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असताना सर्वात प्रथम प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा.

२) अर्ज हा मिळवल्यानंतर अर्जामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती अगदी बिन चुकता भरावी, जसे की आधार कार्ड क्रमांक, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती.

३) संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर शेवटी पासपोर्ट आकारच फोटो लावा.

४) अशाप्रकारे फॉर्म पूर्ण भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत आणि हा जो फॉर्म आहे तो शासकीय कार्यालयामध्ये (www.india.gov.in free silai machine online form) म्हणजेच तहसील कार्यालयामध्ये, ग्रामपंचायत मध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जाऊन यापैकी कोणत्याही कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जमा करू शकता.

कार्यालयामधील अधिकारी तुमच्या अर्जाची पूर्णपणे पडताळणी करून घेतील आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही पात्र असल्यास योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन भेटेल. या निर्देशात येण्यासाठी अर्ज करत असताना शासकीय कार्यालयामध्ये जाऊन योजनेविषयी तपशील माहिती मिळवावी आणि अर्ज सादर करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *