Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Free Internet Facility , Try New Scheme ] : आजच्या युगांमध्ये अत्यावश्यक बाबींमध्ये मोबाईल हे महत्वपुर्ण ठरले आहेत . कारण आजकाल लोक एकवेळचे जेवणे कमी करतील परंतु मोबाईलचा वापर एक दिवसासाठी सोडू शकणार नाहीत . कारण मोबाईलची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे .
शिवाय भारतांमध्ये आता नविन ट्रायच्या नियमांनुसार , सिमकार्ड सुरु करण्यासाठी दरमहा Unlimited रिचार्ज करावेतच लागत आहेत , अन्यथा सिमकार्ड बंद पडत आहेत . तर काही दिवसाच्या नंतर इनकमिंग कॉल्स देखिल बंद होते . यामुळे दरमहा किमान 300/- रुपये पासून रिचार्ज करणे सामान्य जनतेला परवडेनासे झालेले आहेत .
तर अमेरिका सारख्या प्रगत देशांमध्ये गरिबांना मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते , याच धर्तीवर देशातील गरिब नागरिकांना मोफत इंटनेट देण्याकरीता देणेबाबत ट्राय कडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . हा प्रस्ताव भारत सरकारला सादर करण्यात आलेला असून , यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , कि गरिबांना वेगवान इंटरनेट सुविधा मिळण्याकरीता किमान 2MBPS स्पीड अनिवार्यता करण्यात यावित .
कारण ज्या ठिकाणी सर्वसामान्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात ( विशेषत : ) ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची सुविधा कमी वेगावान क्षमतेचे आहेत . याकरीता गरीबांना परवडेल अशा पद्धतीने 200/- रुपये पर्यंत सबसिडी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . यांमध्ये सदर इंटरनेटचा वापर हे ब्रॉडबॅन्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटीकरीता अथवा मोबाईल इंटरनेट करीता असणार आहेत . सबसिडीची रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव आहे . सदरची सबसिडी योजना ही ग्रामीण भागाकरीता असेल .
गरीबांना मोफत इंटरनेटची सुविधा नाहीतर , इंटरनेटकरीता सबसिडी देण्याचा प्रस्ताव ट्रायकडून तयार करण्यात आलेला आहे . कारण सध्या सिमचे रिचार्ज अधिकच महागले आहेत , यामुळे सर्वसामान्यांना इंटरनेट वापराकरीता सबसिडी देण्याचा विचार ट्रायकडून करण्यात आलेला आहे . यावर केंद्र सरकारकडून येत्या अर्थसंकल्पांमध्ये निश्चित विचार केल्यास देशातील गरीब जनतेला दरमहा 200/- रुपयांची सबसिडी प्राप्त होईल .