Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ free battery operated spray pump ] : शेतकऱ्यांना मोफत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास शेतकऱ्यांना दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे .सदर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे अनुदानावर शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे .

सन 2024-25 या वर्षात चालु योजना अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप पुरवठा करणेकरीता महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . याकरीता इच्छक व पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन माध्यमातुन अर्ज करण्यास दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

कापुस तसेच सोयाबीन व इतर तेलबिया आधारित असणाऱ्या पीक पद्धतीला चालना देवून शेतकऱ्यांच्या एकंदरित उत्पन्नांमध्ये वाढ करुन कापुस , सोयाबीन व इतर तेलबिया पिकांमधील मुल्य साखळीस चालना देणे या प्रमुख उद्देशाने राज्य शासनांकडून विशेष कृती योजना सन 2022-23 ते सन 2024-25 या तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या संकेतस्थळावर दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत बॅटरी आधारित फवारणी पंप पुरवठा करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .

अर्ज सादर करण्याची पद्धत : प्रथम सदर पोर्टलवर लॉगिन केल्याच्या नंतर अर्ज करा या मेनुवर क्लिक करुन कृषी यांत्रिकीकरण या मेनुवर जावून मुख्य घटक या बाबीवर क्लिक केल्यानंतर तपशिल या बाबीवर क्लिक करावेत त्यानंतर मनुष्यचलित औजारे या घटकावर निवड केल्यानंतर यंत्र / औजारे  व उपकरणे – पिक संरक्षण औजारे या बाबीवर क्लिक करावेत . त्यानंतर बॅटरी ऑपरेटेड फवारणी ( कापुस / सोयाबीन ) या बाबीवर क्लिक करुन अर्ज सादर करावेत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *