Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ four cabinet nirnay for state employees ] : काल दिनांक 23 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली . या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहेत , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात ..

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी अभ्यास समितीचे गठन : राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता अभ्यास समितीचे गठन करण्यात आले असून , सदर समितीला तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत .

राज्यातील आशा स्वयंसेविका ,गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय : राज्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक ,अंगणवाडी सेविका या ऑन ड्युटी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून आरक्षणाचा लाभ लागू : राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे . दिनांक 30 जानेवारी 2016 पासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती करिता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आली आहे.

न्यायिक अधिकाऱ्यांसाठी सदनिका : बृहन्मुंबई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *