Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming Related Small Business ] : शेती करत असताना , आपण सरकारी अनुदानाचा फायदा घेवून अनेक प्रकारचे लघु उद्योग करु शकतो . ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादना बरोबरच लघु उद्योगांमुळे मोठा आर्थिक फायदा होईल .

कुक्कुट पालन : कुक्कुट पालन या व्यवसायांमध्ये मोठा नफा मिळतो , परंतु होणारे नुकसान पाहता अनेक शेतकरी कुक्कुट पालन व्यवसायांमधून नेहमीच माघार घेताना दिसतात . परंतु कुक्कुट पालन हा व्यवसाय करत असताना शेतकरी कुक्कुट पालनासाठी आवश्यक , पोषक वातावरण तयार करतच नाही . यामुळे कुक्कुट पालनांमध्ये अपयशी ठरतात .

जसे कि उन्हाळा , हिवाळ्यांमध्ये तापमानाचे प्रमाण नियंत्रिक करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असते . तसेच कोंबड्यांचे नियमित लसीकरण केल्यास , कुक्कुट पालन व्यवसाय अधिक फायदेशिर ठरेल .शिवाय कूक्कुट पालन करण्यासाठी सरकारकडून कर्जे देखिल उपलब्ध करुन दिले जाते , तसेच व्याजांमध्ये अनुदान देखिल दिले जाते  . याकरीता आपल्या तहसिल / जिल्हा पशुविभाग कार्यालयांस भेट देवून या योजनेचा लाभ घेवू शकता ..

शेळी / गायी / म्हशी पालन योजना : शेळी / गायी / म्हशी पालन करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते . शेळी पालन योजना मध्ये खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 75 टक्के अनुदान दिले जाते . यांमध्ये 10 शेळी व 01 बोकडा खरेदी करीता अनुदान दिले जाते . तर गायी / म्हशी पालन योजनांमध्ये 2 गायी / 2 म्हशी खरेदी करीता 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते . या योजनाचा लाभ घेण्याकरीता आपल्या तालुका / जिल्हा पशुसंवर्धन विभागास भेट द्यावेत .  

मध्य केंद्र योजना : आजकाल मध केंद्र योजनांच्या माध्यमातुन अनेक तरुण लाभ घेवून आर्थिक लाभ मिळवत आहेत . सध्या राज्य शासनांकडून या योजनेवर अधिक भर दिला आहे . यांमध्ये मधमाशा पालनाकरीता अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनांच्या खादी व ग्रामोद्योग मंडळ तर्फे मध केंद्र योजना राबविण्यात येत आहे . या योजनांनुसार मधपेट्या खरेदी साहित्याच्या किंमतीच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येते . परंतु या करीता प्रथम प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहेत .

वराह पालन : वराह पालनाकडे आजकाल राज्यातील तरुणांचा अधिक कल वाढला आहे , कारण वराह पालनांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होतो . कारण वराहांना कोणत्या प्रकारचे वाढीव खर्च लागत नाहीत .यामुळे वराहांना वाढविण्याचा कमी खर्चांमुळे अधिक नफा प्राप्त होतो . म्हणूनच आजकाज राज्यातील तरुण वर्ग सरकारी योजनांच्या माध्यमातुन फायदा घेवून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेत आहेत . 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत या योजनेतुन अनुदान दिले जाते .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *