Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Foods And Crops Festivals Anudan Scheme ] : महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून फळे व धान्य महोत्सव अनुदान राबविण्यात येते . या योजना अंतर्गत मोसंबी , द्राक्षे , आंबा , संत्री इ. हंगामी फळे त्याचबरोबर उत्पादकांकडून थेट ग्राहक पर्यंत धान्य विक्रीकरीता उत्सव आयोजित करण्यात येते . यांमध्ये महोत्सव करीता प्रति स्टॉल साठी 2000/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जातात .
या योजना अंतर्गत पात्र लाभार्थी : या योजना अंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या , तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या , पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था , सहकारी संस्था , उत्पादकांच्या सहकारी संस्था या योजनांसाठी लाभास पात्र ठरणार आहेत .
या योजना अंतर्गत लाभाकरीता अटी व शर्ती : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी फळे व धान्य महोत्सवाचा किमान कालावधी हा 05 दिवसांचा असला पाहिजे , तसेच महोत्सवाकरीता किमान 10 आणि कमाल 50 स्टॉलसाठी अनुदान देण्यात येतील .तसेच फळ व धान्य महोत्सव आयोजन करीता एका लाभार्थ्यास आर्थिक वर्षात फक्त एकाच वेळी अनुदान दिले जातील .
त्याचबरोबर महोत्सवा दरम्यान चांगल्या / उत्त्तम दर्जाचे माल विकणे स्टॉलधारकांवर बंधनकारक असणार आहेत , याची सर्वस्वी जबाबदारी ही आयोजकांवर असेल . सदरचा महोत्सव हा केवळ उत्पादकांकरीता असल्याने , यांमध्ये व्यापाऱ्यांना सहभागी होता येणार नाही अथवा बाजारातुन आणून मालाची विक्री करता येणार नाही . याकरीता आयोजकास अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहेत .