Live Marathipepar संगिता पवार प्रतिनधिी [ Five Star Rating Car ] : आपण जर कार घेण्याचा विचार करत असाल तर , भारतांमध्ये उपलब्ध असलेल्या 5 स्टार रेटेट कार घ्या . ज्यांमध्ये आपणांस 10 लाखांच्या आतमध्ये बजेट असणाऱ्या कारंमध्ये सुरक्षतेच्या बाबतीत सर्वात जास्त हमी मिळते . असे कोण- कोणत्या कार आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.टाटा पंच ( Tata Punch ) : भारतांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारी कार म्हणून टाटा पंच कडे पाहिले जाते , दरवर्षी टाटा पंचची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे . याचे मुख्य कारण म्हणजे ग्लोबल क्रॅश टेस्टिंग मध्ये या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत . प्रौढांच्या सुरक्षेसाठी एकुण 17 गुणांपैकी 16.45 गुण मिळाले आहेत जे कि भारतांमध्ये सर्वात जास्त गुण आहेत , टाटा पंचच्या सर्व व्हेरिएंट मध्ये सुरक्षतेच्या बाबतीत सर्वात सुरक्षित कार मानली जाते , या कारमध्ये आपणांस सीएनजी व इलेक्ट्रिक व्हेरिएंट देखिल उपलब्ध आहेत . तर या कारची शोरुम किंमत 5.70 लाख रुपयांपासून सुरुवात होते .
02.महिंद्रा XUV 300 ; टाटा पंचनंतर कमी किंमतीच्या रेंज मध्ये मिळणारी कारचा विचार केला असता , महिंद्रा XUV 300 ही कार सुरक्षतेच्या बाबर 5 स्टार रेटिंग आहे . या कारला ग्लोबर क्रॅश टेस्टिंग मध्ये प्रोढांसाठी 17 गुणांपैकी 16.42 गुण मिळाले आहेत . जे कि टाटा पंचनंतर क्रमांक लागतो . या कारची किंमत 8.41 लाख रुपयांपासुन सुरुवात होते .
03.टाटा अल्ट्रोझ : टाटा अल्ट्रोझ या कारला प्रौढांच्या सुरक्षतेच्या बाबतीत 17 गुणांपैकी 16.13 गुण प्राप्त झाले आहेत , ही कार प्रौढांसाठी 5 स्टार रेटींग आहे तर मुलांच्या सुरक्षतेच्या बाबीत 3 स्टार रेटींग आहे . या कारची बेस मॉडेची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरुवात होते .
04.टाटा नेक्सॉन : टाटा नेक्सॉन ही कार सुक्षतेच्या बाबीत सर्वात जास्त सुरक्षित मानली गेली कारण या कारने 17 गुणांपैकी 16.06 गुण तर मुलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत 49 गुणांपैकी 25 गुण मिळविले यामुळे या कारला प्रौढांसाठी 5 स्टार तर चाईल्ड साठी 3 स्टार रेटिंग मिळाले आहेत .
05.होंडा जॅझ : होंडा जॅझ या कारला सुरक्षतेच्या बाबतीत 17 गुणांपैकी 13.89 गुण प्राप्त झाले आहेत . यामुळे या कारला 4 स्टार रेटिंग प्राप्त झाले आहेत . या कारची शोरुम किंमत 7.77 लाख रुपयांपासून सुरुवात होते .