जगातील पहिल्या CNG बाईकचे राज्यात विक्रीस सुरुवात ; 2 KG CNG मध्ये 230 किमीचा टप्पा गाठते ! जाणून घ्या किंमत मॉडेल ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ First cng bike launch in Maharashtra ] : सध्या जगांमध्ये इलेक्ट्रिक बाईकची संख्या वाढल्यानंतर आता सीएनजी बाईकला सुरुवात झालेली आहे , भविष्यांमध्ये पेट्रोल / डिझेलच्या साठा संपुष्टात येण्याच्या भितीमुळे पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा शोध लावण्यात येत आहेत .

बजाज कंपनीकडून जगातील पहिल्या सीएनजी बाईकच्या तीन मॉडेल विक्रीस सुरुवात केली आहे . केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये , राज्यातील पिंपरी चिंचवड येथे सदर सीएनजी बाइकचे लाँचिंग सोहळा पार पडला . यांमध्ये बजाज कंपनीने नितीन गडकरी यांच्या शब्दाचा मान राखत बाईकची किंमत देखिल ग्राहकांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे .

सदर बाईकची किंमत ही 95,000/- ते 1,10,000/- अशी मॉडेलनुसार ठेवण्यात आली असून , ग्राहकांना विक्रीसाठी सुरुवात करण्यात आली आहे . ग्राहकांचा सीएनजी बाईक खरेदीसाठी पहिल्या दिवसांपासुनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे , बजाज कंपनीकडून सांगण्यात आले .

सीएनजी बाईकचे मायलेज : सदर सीएनजी बाईक ही सीएनजी + पेट्रोल अशी आहे , सदर बाईक ही 2 लिटर पेट्रोल + दोन किलो सीएनजी वर 330 किलामीटरचा अंतर कापते , यांमध्ये 2 किलो सीएनजीवर तब्बल 230 किलोमीटरचे अंतर कापते . यामुळे ही बाईक सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारी बाईक आहे .

सीएनजीचे 3 मॉडेल : बजाज कंपनींकडून 3 सीएनजी मॉडेल लाँच करण्यात आले आहेत . सदर मॉडेलनुसार बाईकची किंमत ही 95,000/- ते 1,10,000/- अशी ठेवण्यात आलेली आहे .

सदर बजाजची बाईक ही गॅरंटीची बाईक असल्याचे नितीन गडकरी यांनी ग्वाही दिली आहे . यावेळी राजीव बजाज यांनी देशांमध्ये सीएनजी पंपाची संख्या वाढवावी अशी विनंती करण्यात आली .

Leave a Comment