Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ financial right for men in case of divorce ] : घटस्फोट झाल्यानंतर नेहमीच पुरुषांना महिलांना पोटगी द्यावी लागते , यामुळे पुरुष नेहमीच आर्थिक तंगी मध्ये सापडतात . परंतु घटस्फोटानंतर पुरुषांना देखील काही आर्थिक अधिकार असतात ते नेमके कोणते ? ते पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..
बऱ्याच वेळी हुंडाबंदी कायदा याचा गैरवापर होवून पुरुषांना शिक्षा होते , परिणामी घटस्फोटानंतर पत्नीला पोटगी द्यावी लागते . परंतु सदर कायद्याचा गैरवापर होत असल्यास पुरुषांना देखील काही अधिकार देण्यात आलेली आहेत , ज्या माध्यमातून पोटगी देण्यापासून पुरुषांना संरक्षण मिळते .
जर महिला गृहिणी असेल आणि ती आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे पतीवर अवलंबून असेल . अशावेळी घटस्फोटाच्या नंतर सदर पुरुषाला पत्नीस पोटगी द्यावीच लागेल . याशिवाय पुरुषांच्या संयुक्त संपत्ती मध्ये देखील सदर महिलेचा अधिकार असतो . परंतु काही बाबी मध्ये महिलांना घटस्फोटानंतर पोटगी द्यावी लागत नाहीत , असे प्रकरणे पुढील प्रमाणे पाहूयात .
जर पत्नी कमावती असेल आणि पती गृह कामात व्यस्त असेल व तो आर्थिक दृष्ट्या पत्नीवर अवलंबून असेल . अशा प्रकरणी घटस्फोटानंतर पतीला पत्नीकडून पोटगी द्यावी लागते . त्याचबरोबर पती हा अपंग असेल आणि तो पत्नीच्या जागी गृह काम करीत असेल व पत्नी कमावती असेल . अशा प्रकरणी देखील घटस्फोटानंतर पत्नीला पतीस पोषणाकरिता आर्थिक सहाय्य करावे लागते .
त्याचबरोबर मुलांचा ताबा पतीकडे राहिल्यास व पत्नी कमवती असेल , अशा प्रकरणी देखील पत्नीला मुलांचा सांभाळ करण्याकरिता काही रक्कम द्यावी लागते .