Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming Related Business info ] : शेतीवर आधारीत असणारे व्यवसाय केल्यास , आपणांस शेतीला जोडधंदा होईल व शेतीमधून मिळणारे उत्पन्न देखिल वाढेल , चला तर मग शेतीवर आधारीत व्यवसाय कोणकोणते आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

मशरुमची शेती : मशरुमची शेती आजच्या काळांमध्ये सर्वाधिक फायदेशिर आहे , मशरुमला शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे . यामुळे मशरुम शेती आपणांस अधिक फायदेशिर ठरणार आहे . मशरुमची शेती ही छोट्या क्षेत्रांमध्ये देखिल केली जावू शकते . तर मशरुमचा 15 ते 20 डिग्री अंश सेल्सियस इतका तापमान व 80 ते 90 टक्के आर्द्रता , स्वच्छ प्रकाश अशा प्रकारचे हवामान लागते . मशरुम शेतीसाठी सरकारकडून अनुदान  देखिल मिळते . मशरुमला विदेशांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने , मशरुमचा चांगला भाव मिळतो .

मत्स्यपालन : मत्स्यपालन शेतीकरीता विशेष लक्ष्य देणे आवश्यक नसते , एकदा जर मत्स्यबीज टाकले असता , नियमित खाद्य टाकणे शिवाय इतर कोणत्याही प्रकारचे विशेष लक्ष्य द्यावे लागत नाही . मत्स्यपालन करीता केंद्र / राज्य सरकारकडून कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते . यामुळे मत्स्यपालन हा व्यवसाय देखिल आपणांस फायदेशिर ठरणारा आहे .

मुरमुरे व्यवसाय : ग्रामीण भागांमध्ये पुर्वी मुरमुरे बनविले जायचे , परंतु आजच्या धावपळी युगांमध्ये मुरमुरे बनविण्याची कलाच व्यपगत होत गेली आहे  , त्याची जागा आज यंत्राने घेतली आहे . यंत्राद्वारे मुरमुरे बनविले जाते , मुरमुरे बनविण्यासाठी छोट्या युनिट द्वारे देखिल हा व्यवसाय तयार करु शकतो , तर यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे तांदुळ ग्रामीण भागांमध्ये सहज उपलब्ध होणारा पिक आहे . यामुळे कच्चा मालाची सहज उपलब्धेमुळे हा व्यवसाय अधिक परवडणारा आहे .

रेशम व्यवसाय : रेशम तयार करण्यासाठी तुतीची लागवड करावी लागते , त्यावर रेशमी किडे सोडावे लागते , जे कि रेशम तयार करतात , एकादा तुतीची लागवड केल्याच्या नंतर निदान 15 वर्षे तुतीची दुहेरी लागवड करण्यास आवश्यक नसते . सदर व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध करुन देणयत येते , यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांना अधिक फायदेशिर ठरणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *