तब्बल 75 हजाराची नोकरी सोडून शेतीमध्ये केला , हा प्रयोग ! आज करोडोची उलाढाल !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Farming Gandul Khat Prayog ] : काव्या दातखिळे ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दातखिळेवाडी गावाची रहिवाशी असून , त्याने बीएससी नर्सिंग पुर्ण करुन त्यानंतर टाटा रुग्णालयात तब्बल 2 वर्षे काम केले , त्यांमध्ये काव्याला तब्बल 70-75 हजार रुपये पगार मिळत होतो , शिवाय काव्या पर्ममंट सेवेत होती . तरी देखिल काव्याला समाधान वाटत नव्हत .

काव्याला काहीतरी वेगळं करावंस वाटत होत , त्याने मातीमध्ये प्रयोग करण्याचे ठरविले .त्याची वडिलोपार्जित शेतीलमध्ये रासायनित खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निर्देशन आले , परंतु  मातीखली असणाऱ्या सुक्ष्मजीवांबाबत फारसा विचार केला जात नाही हे काव्याच्या लक्षात आले आहे , आणि त्याने ठरवल कि जीवाणू आणि बुरशींना एकत्रित घेवून काम करायचे , याकरीता काव्याने गांडूळ ख निर्मितीचा प्रकल्प उभा केला . त्याकरीता प्रथम त्याने शेड उभारणी केली .

परंतु गांडूळ खत निर्मिती करुन लगेच बाजारांमध्ये विकले हे सहज शक्य नव्हते त्याकरीता त्याने सोशल मिडीयाचा वापर केला त्याने तयार केलेला गांडूळ खताबाबत 15 मिनिटांचा व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर अपलोड केला त्यानंतर त्याला चक्क 5 टनाची ऑर्डर देखिल मिळाली ती एकाच शेतकऱ्याकडून , तेवढा माल देखिल काव्याने तयार केला नव्हता .ऑर्डन नंतर काव्याचा आत्मविश्वास अधिकच वाढला व त्याने गांडूळ खताची अधिक माल बनविण्यास सुरुवात केली .

त्यासोबतच त्यांने वर्मिवॉश , गांडूळ बीज यांचे उत्पादन देखिल देण्यास सुरुवात केली . एका महिन्यामध्येच त्याची गांडूळ खताची एक बॅच विक्रीस तयार होते , त्यामुळे त्याचा प्रती बॅच मध्ये 15 टनांचा माल तयार होतो . त्यातुन काव्यास प्रति बॅच दीड लाखांचा निव्वळ प्रॉफिट होतो तर वर्मिवॉशमध्ये काव्यास 100 टक्के फायदा मिळतो .

काव्याने सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करुन गांडूळ खताची विक्रि करतो त्यामध्ये त्याचे पती हे पेशाने इंजिनिअर आहेत , त्यांमध्ये त्यांचा मोठा हातभार लागतो . सोशल मिडीयाचा वापर करुन विक्रीमध्ये वाढ होण्यास मदत होत असल्याचे काव्याने सांगितले . यावरुन समजते कि , शेतीमध्ये देखिल चांगल्या प्रकारचे प्रयोग करुन अधिक नफा प्राप्त करु शकतो ..  

Leave a Comment