Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Salokha Scheme ] : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीनीच्या ताबा संदर्भात राज्य सरकारकडून सलोखा योजना राबविण्यात येते , या योजनांच्या माध्यमातुन जिल्हा पातळीवर सलोखा  पद्धतीने जमीनीतील वाद मिटविण्यात येतो , व जमिनीचा ताबा सोडण्यात येतो .

या योजनेच मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आप- आपसातील वाद मिटविणे व समाजांमध्ये सलोखा निर्माण करणे . शेतकऱ्यांमध्ये एकमेकांमधील सौख्य व सौहार्य वाढीस येणेकरीता राज्य शासनांने ह्या योजनेची सुरुवात केली आहे . ह्या योजनेच्या माध्यमातुन राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे जमीन वादाचे प्रकरण मार्गी लावण्यात आलेले आहेत .

या योजनांच्या माध्यमातुन शेतजमीनीचा ताबा बाबत वाद हे आपआपसांमध्ये मिटविल्यास शासनांकडून काही सवलती देण्यात येते . जसे कि शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदला बदलीकरीता नोंरणी फीस तसेच मुद्रांक शुक्ल मध्ये सवलत देण्यात येते . शेतजमीन अदला बदल दस्तांकरीता मुद्रांक शुल्क ही नाममात्र 1,000/- रुपये आणि नोंदणी शुल्क 1000/-रुपये आकारण्याबाबत , सवलत देणेकरीता शेतकऱ्यांसाठी सलोखा ही योजना राबविण्यात येते .

सलोखा योजना नेमकी काय आहे ? : ह्या योजनेत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा हा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर असणारी शेतजमीनीचा ताबा हा पहिल्या शेतकऱ्यांकडे असेल तर अशा प्रकरणी वाद न करता शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीकरीता नोंदणी फीस व मुद्रांक शुल्क यांमध्ये सवलत देण्यात येते .

ही योजना वाणिज्यिक वापराच्या जमीनीकरीता लागू असणार नाही , फक्त शेतजमिनीच्या प्रकरणीच ही योजना लागु असणार आहे. म्हणजे सदर योजना अंतर्गत शेतजमिनीची अदलाबदल करण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फीस मध्ये सवलत देण्यात येत असते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *