Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmers protest news ] : पीकविमा भरपाई , कर्जमाफी साठी राज्यातील शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत , राज्य शासनांकडून कर्जमाफी तसेच पीकविम्याच्या भरपाईसाठी कोणत्याही प्रकारची तरतुद न केल्याने , महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी एकत्र येवून आंदोलन केले आहेत .
महाविकास आघाडी पक्षांच्या वतीने शेतकऱ्यांचे चालु व थकीत कर्जाची सरसकट प्रमाणे माफ करण्याचे तसेच मागील खरीप हंगामामधील पीकविमा देखिल तात्काळ देण्याची मागणी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी शनिवारच्या दिवशी लातुर – तुळजापुर नॅशनल महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोजन करण्यात आले .
या आंदोलनांमुळे रस्त्यावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली , तर महाविकास आघाडी पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी विद्यमान सरकारवर टीका केल्या . सदर मागणी पुर्ण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे यांच्याकडे सादर करण्याच्या हेतुन नायब तहसीलदार सुरेश पाटील यांनी मागणींचे निवेदन पत्र स्वीकारल्याच्या नंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .
याशिवाय औसा तालुक्यामधील सर्वच महसुल मंडळाला पीकविम्याची भरपाई ही सरसकट मंजुर करण्याचे निवेदन देण्यात आले आहेत . याशिवाय गतवर्षी कमी पावसांमुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक संकटांमध्ये सापडले असल्याने सरसकट कर्जमाफी मंजूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
यावेळी महाविकास आघाडीचे जिल्हा , तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते , यांमध्ये आंदोलन स्थळी शिवसेनेचे लातुर जिल्हाप्रमुख ( उद्धव ठाकरे ) दिनकर माने , तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे , जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपराव काकडे , आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !