Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Vehicle Loan Scheme ] : शेतकऱ्यांना कृषी मुदत कर्ज येाजना अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत 2 / 3 व्हीलर्स खरेदी करण्याकरीता कर्ज उपलब्ध करुन दिले जाते . याकरीता आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कृषी टर्म लोन योजना अंतर्गत 2 / 3 व्हीलर्स साठी कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असावा त्याकडे स्वत : च्या मालकीची जमिनी असावा अथवा दुग्धशाळा , कुक्कुटपालन , रेशम शेती , मत्स्यपालन इ. कार्यामध्ये गुंतवला असला पाहीजे . तसेच अर्जदाराकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असेल , तसेच अर्जदाराचे इतर बँकेकडे कर्ज प्रलंबित असू नयेत . तसेच अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . तर कमाल वय हे 70 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत .

मुख्य उद्देश : या कृषी मुदत योजनांचे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना नविन वाहने यांमध्ये 2 / 3 व्हीलर कॅरीज , शेती संचालनाचे पर्यवेक्षण / शेती तसेच मालमत्तेचे प्रभावी व्यवस्थापन आणि कृषी उत्पादन / आदान , श्रम इ.बाबीकरीता वाहतुकीसाठी खरेदी करीता मुदत कर्जे उपलब्ध करुन हे होय .

कर्जाची रक्कम : यांमध्ये अर्जदाराने वाहन खरेदीवेळी वाहनांच्या 25 टक्के किंमत तसेच आरटीओ शुल्क भरणे आवश्यक असेल , हे सोडून कमाल 1.25 लाख रुपये इतकी कर्जाची रक्कम प्राप्त होते . यावरील व्याजदर हे 1 वर्षे MCLR + 0.75 टक्के इतका व्याजदर आकारण्यात येतो .

आवश्यक कागदपत्रे : अर्जदाराचे 7/12 , 8 अ , इतर बँकेचे नादेय प्रमाणपत्र , वाहनांचे कोटेशन , हमीपत्र इ. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट देण्याकरीता Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *