Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer various demand in budget 2024 ] : मोदी सरकारने नव्याने पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर एनडीए सरकारचा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण हे संसदेमध्ये देशाचे अर्थसंकल्प मांडणार आहेत , यांमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत . अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच्या वतीने वित्त मंत्री निर्मला सितारमण यांची भेट घेवून विविध मागण्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत .

केंद्रीय पुर्ण अर्थसंकल्प हे दिनांक 23 जुलै रोजी तर दिनांक 22 जुलै ते 22 ऑगस्ट या काळांमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून सुचविण्यात आलेल्या अपेक्षा कितपत पुर्ण होईल , याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .

शेतमालाचे भाववाढ : जर शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य प्रकारचे भाव मिळाल्यास , शेतकऱ्यांना कोणाच्याही पदरी हात जोडावे लागणार नाही . यामुळे सरकारने शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , देशात इतर वस्तुंची किंमत दरवर्षी निदान 5 ते 10 टक्क्यांची वाढ होते , परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव हे फक्त 1 ते 2 टक्के पर्यंत वाढ केली जाते . यामुळे शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे .

किसान योजनेच्या हप्त्यांमध्ये वाढ : केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम किसान योजनेचा देशातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे , पंरतु यातील मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांना कमी पडते , यामुळे पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वार्षिक 6 हजार ऐवजी 8 हजार करण्यात यावी , अशी मागणी करण्याचे प्रस्ताव वित्त विभागांकडे सादर करण्यात आला आहे .

याशिवाय पिकविम्याची रक्कम विना विलंब मिळण्याची नियोजन करण्यात यावेत , जेणेकरुन शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दुर होईल . तसेच शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाजाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अंदाज व्यक्त करणारे तंत्र विकसित करण्याचे मागणी करण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *