Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Scheme ] : राज्यातील शेतकऱ्यांना पॉलीहाऊस / शेडनेट हाऊस , मसाले शती , तसेच सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला / फळे उत्पादन इ.आधुनिक पद्धतीने शेती करीता राज्य सरकारकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते .
योजना विषयक थोडक्यात : ही योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यात कुशल तसेच अकुशल विशेषत : बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे . तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहाराविषयी पोषणमुल्य वाढविणे , त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकत्रित करुन शेतकऱ्यांचे गट निर्माण करणे , शेतकरी उत्पादक समूह स्थापित करुन उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे हा मुख्य उद्देश आहे .
या घटकांकरीता घेता येईल शेतकऱ्यांना लाभ : उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका स्थापन करणे , उतीसंवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण / पुनरुज्जीकरण करणे , तसेच भाजीपाला विकास कार्यक्रम , गुणवत्ता पुर्ण लागवड साहित्य आयात करणे , भाजीपाला बियाणे , पॅकिंग , साठवणूक इ. पायाभुत सुविधा , अळिंबी उत्पादन करणे , पुष्प उत्पादन करणे , मसाला पिके लागवड करणे , जुन्या फळबागाचे पुनज्जीकरण करणे , उत्पादक मध्ये वाढ करणे .
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक व्यवस्थापन , पॅक हाऊस , पुर्व शितकरण गृह शितगृह (नवीन/विस्तारीकरण/आधुनिकीकरण), शितसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे, शितवाहन, प्राथमिक/फिरते प्रक्रिया केंद्र, , रायपनींग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूक गृह पॉलिहाऊस तसेच कमी किमतीचे फळ – भाजीपाला साठवण केंद्र करीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते .
त्याचबरोबर फल उत्पादन करण्यासाठी पणन सुविधा स्थापन करणे यांमध्ये शासकीय / खासगी तसेच सहकारी क्षेत्रांकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते . तसेच सदरच्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे , वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते .
आश्यक पात्रता : सदर योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा शेतकरी असला पाहिजे , त्याच्या नावावर शेती असणे आवश्यक असेल तसेच शेतांमध्ये फलोत्पादन पिके असणे आवश्यक असेल . समुह शेती मध्ये समुहात 02 किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी असणे आवश्यक असेल .
अर्ज सादर करण्यासाठी व अधिक माहितीसाठी Click Here