Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agri Award shasan Niarny ] : राज्यातील शेतकरी व संस्थानां सन 2020,2021  व सन 2022 करीता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन सन्मान करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्यातील कृषी , कृषी संलग्नीत क्षेत्र त्याचबरोबर फलोत्पादन क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार , वसंतरावर नाईक कृषीभुषण पुरस्कार , तसेच जिजामाता कृषीभुषण पुरस्कार , कृषी भुषण ( सेंद्रीय शेती करीता ) पुरस्कार , वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार , युवा शेतकरी पुरस्कार , उद्यानपंडीत पुरस्कार , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार असे विविध प्रकारचे पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते .

यानुसार सन 2020 ,2021 , 2022  या वर्षाकरीता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी / संस्था यांचा सन्मान करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार सदर वर्षाकरीता कृषी पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थींची नावे निश्चित करण्याकरीता मा.कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन 2020 , 2021 , 2022  करीता कृषी पुरस्कारां करीता सदर शासन निर्णयांमध्ये जोडलेल्या वर्षनिहाय नमुद केल्यानुसार व्यकती / संस्था यांची नावे निश्चित करण्यात आलेले असून त्यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहेत .

यानुसार विविध कृषी पुरस्कार करीता निवड करण्यात आलेल्या व्यक्ती / संस्था यांना पुरस्कार वितरीत करण्याकरीता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांच्या वर सोपविण्यात येत आहेत .

वर्षनिहाय व पुरस्कार निहाय शेतकरी / संस्थांची नावे पाहण्यासाठी कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 23.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *