Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer PM Kisan Sanman Nidhi Scheme ] : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणे करीता केंद्र शासनांच्या PM किंसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभाकरीता E-KYC प्रमाणीकरण करणे आवश्यक आहेत . त्या अनुषंगाने दिनांक 21.02.2024 पर्यंत राज्यात विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत .

या मोहिम अंतर्गत E-KYC प्रमाणीकरण करणे तसेच योजना साठी नव्याने नोंदणी करणे तसेच बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पुर्तता करण्याकरीता शेतकऱ्यांना समक्ष हजर हजर रहावे लागणार आहेत . शेतकऱ्यांनी E-KYC प्रमाणिकरण करण्यासाठी मोबाईल वरील OTP तसेच सामाईक सुविध केंद्र , PM किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा लागणार आहे .

बँक खाती आधार संलग्न नसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या डाक कार्यालयांमध्ये आधार संलग्न खाते उघडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच यापुर्वी राबविण्यात आलेल्या दि.06.12.2013 ते 15.01.2024 या 45 दिवसांच्या मोहिम अंतर्गत 1,04,000 शेतकऱ्यांचे E-KYC प्रमाणीकरण त्याचबरोबर 3,01,000 स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे .

सदर मोहिम ही क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्याकरीता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्त यांना निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या संबंधित गावामधील कार्यरत कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक , तालुका कृषी अधिकारी , तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *