Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer pahchan patra ] : विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याकरीता आता शेतकऱ्यांना किसान ओळखपत्राची आवश्यकता भासणार आहे . याकरीता सरकारकडून विशेष शिबिरे आयोजित करुन शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचे काम सुरु आहे .

केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत दिनांक 28.11.2024 रोजीच्या दिलेल्या निर्देशानुसार , शेतकऱ्यांसाठी डिजिटल पद्धतीने ओळखपत्र तयार करण्यासाठी देशातील सर्व राज्यांनी शिबिरे आयोजित करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .

शेतकरी ओळखपत्र ( Farmer ID ) : सदर शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे डिजिटल पद्धतीने आधारशी कनेक्ट केले जाईल , तसेच त्यांमध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहितीसह जमिनीचा तपशिल , पेरणी , तसेच हमीभाव करीता आवेदन करता येणार आहे .

त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर शेतकरी ओळखपत्र फायदेशिर ठरणार आहे , तर सदर कार्ड आधारशी कनेक्ट असल्याने , शेतकऱ्यांना विविध योजनांच्या निकष करीता वापरते जाणार आहेत .

सदरचे काम वेगाने सुरु असून , सरकारकडून एका शिबिर करीता 15 हजार रुपयांचे अनुदान तर एका ओळखपत्राकरीता 10 रुपये अनुदान दिले जाणार आहेत . महाराष्ट्र , मध्य प्रदेशन , गुजरात व उत्तर प्रदेश राज्यामध्ये सदर शेतकरी आयडी कार्ड तयार करण्याचे कामकाज वेगाने सुरु आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *