Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Nukasan Bharapai Anudan Shasan Nirnay ] : राज्यांमध्ये सन 2020 ते सन 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मतद वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत शुद्धीपत्रक संदर्भात महसूल व वन विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार सन 2020 ते सन 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरीता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयासोबतच्या निधी वितरीत करण्यास मान्यता आलेल्या प्रपत्रकातील अनु क्रमांक 2 नागपुर विभागाच्या दिनांक 08 मार्च 2023 च्या प्रस्तावा समोरील ..
लेखाशिर्ष क्र .2245 0315 खालील तरतुद रुपये 251.34 लख ऐवजी 137.33 लक्ष तसेच लेखाशिर्ष क्रमांक 2245 0271 खालील तरतुद ही निरंक ऐवजी 114.01 लख अशी वाचण्यात यावेत , असे सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत .
याबाबत राज्य शासनांच्या महसुल व वन विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
