Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Milk Anudan Shasan Nirnay ] : राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रुपये 5/- रुपये अनुदान देणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रुपये 5/- अनुदान देण्याचा निर्णय सदर विभागाच्या दिनांक 26.02.2024 नुसार घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

सदर विभागाच्या दिनांक 01.01.2024 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.02 हा सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत दुध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट / 8.2 एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान रुपये 27/- प्रतिलिटर इतका दर संबंधित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पद्धतीने ( ऑनलाईन ) अदा करणे बंधनकार राहील , त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये 5/- प्रतिलिटर बँक खात्यांवर थेट वर्ग करण्यात यावेत असा आहेत .याऐवजी पुढीलप्रमाणे शासन शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहेत .

सहाकरी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत दुध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट / 8.5 एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान रुपये 25/- प्रतिलिटर इतका दर संबंधित दुध उत्पादक शेकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पद्धतीने ( ऑनलाईन ) अदा करणे बंधनकार असणार आहेत , त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये 5/- प्रतिलिटर बँक खात्यांवर थेट वर्ग करण्यात यावेत असे वाचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *