Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer loan withen 10 Minit ] : देशातील शेतकऱ्यांना सहज व ऑनलाईन पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यासाठी बँका अनेकवेळा कर्ज देण्यास नाकारतात , यामुळे शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होत नाहीत . यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वेळोवेळी पुर्ण होत नाहीत , यामुळे आत्महत्या सारखे प्रकार शेतकऱ्यांसाठी उचलले जाते .
केंद्र सरकारच्या माध्यमातुन हे शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहेत , यांमध्ये प्रथम दोन जिल्हातील शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून , त्यानंतर देशातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे . यांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील फारुखाबाद आणि महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे .
वरील दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातुन सहल व सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे , ज्यांमुळे शेतकऱ्यांना बँकाचा होणारा जाच बऱ्याच अंशी कमी होणार आहे . ही कर्ज सुविधा ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून , ही प्रक्रिया फक्त 10 मिनिटांमध्ये पुर्ण होणार आहे .
ॲग्री स्टॅक ॲप : शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन कर्ज पुरवठा करण्यात येणार असून , याकरीता ॲग्री स्टॅक ॲप ह्या ॲपच्या माध्यमातुन प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे . सदर ॲपच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना केवळ 10 मिनिटांमध्ये सर्व प्रक्रिया पुर्ण करुन दीड लाभ रुपये पर्यंतचे कर्ज बँक खात्यांमध्ये वर्ग केले जातील . याकरीता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे तारण ठेवावे लागणार नाही . या उपक्रमाची सुरुवात राज्यातील जिल्हाकरीता माहे मे 2024 पासून सुरुवात होणार आहे .
देशांमध्ये सर्वात जास्त दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यातील बिड जिल्ह्याचे नाव अग्रेस्थानी येते , शिवाय बिड जिल्ह्यांमध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे . यामुळे राज्यातील बिड जिल्ह्यांची निवड सदर उपक्रम करीता करण्यात आलेली आहे .
ॲग्री स्टॅक ॲपवर पिकांची नोंद : या ॲपमध्ये शेतकऱ्यांना पिंकांची अचूक माहिती नोंदवावी लागणार आहे , हे ॲप शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन सहज व सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याकरीता विकसीत करण्यात आलेले असल्याने , या ॲपवर अचूक माहिती भरणे आवश्यक असणार आहेत .
अशी असणार प्रक्रिया : याकरीता प्रथम मोबाईल मध्ये ॲग्री स्टॅक ॲप डाऊनलोड करुन घ्यावे , त्यानंतर त्यांमध्ये नाव , आधार क्रमांक टाकल्यानंतर SMS द्वारे OPT टाकुन पडताळणी होईल .
- यांमध्ये कर्ज हवे असल्यास आपले सातबारा आधार कार्डशी संलग्नित करणे आवश्यक असणार आहेत .
- तर कर्ज घेण्याकरीता सर्व माहिती भरावी , यांमध्ये बँकेच्या कर्ज सुवधा शेतकऱ्यांना दिसणार आहेत . त्यापैकी एका सवलतीचा वापर करुन कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल .
- यांमध्ये राष्ट्रीय तसेच खासगी त्याचबरोबर सहकारी बँकांच्या माध्यमातुन कर्ज पुरवठा करण्यात येईल . तर या कर्जाचे विशेष म्हणजे हे सुविधा स्वयंचलित पद्धतीने असणार आहे .
- यांमध्ये 1.50 लाख रुपये पर्यंत रक्कम कर्ज स्वरुपात मिळेल .
- ही सुविधा मे महिन्यांत राज्यातील बिड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .