नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना करीता निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित GR दि.28.02.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी  [ Farmer Loan Shasan Nirnay ] : राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करीता राज्यस्तर या योजनासाठी निधीचे वितरण करीता राज्य शासनांच्या सहकार व पणन विभागांकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यांमध्ये माहे जुलै 2019 ते माहे ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या पुर परिस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याच्या योजना अंतर्गत आतापर्यंत राज्य शासनांकडून 52,562.00 लाख रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे . सदर योजना अंतर्गत 379.99 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून सादर करयण्यात आला आहे .

यासाठी सन 2023-24 करीता सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये 379.99  लाख इतका निधी मंजूर निधी वितरणाचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचाराधीन होता , सदर निर्णयान्वये या योजनासाठी सन 2023-24 करीता सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99  लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70 टक्के म्हणजे रुपये 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते माहे ऑगस्ट 2019 या कालामध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखाशिर्ष अंतर्गत वितरीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहेत .

सदर निधीचा खर्च हा व्ही -02 , 2435 इतर कृषी विषयक कार्यक्रम , 60 इतर , शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना , नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी , 33 अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधेन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भात सहकार व पणन विभागांकडून दिनांक 28.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

शेतीविषयक योजना , कृषी अपडेट विषयक अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून WhatsApp ग्रूप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment