Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Loan let -off shasan Nirnay ] : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी ( राज्यस्तर ) योजना करीता निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 30 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यांमध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजना अंतर्गत रुपये 52,562.00 लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे . तसेच सदर योजनासाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनाच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक , पुणे यांच्या पत्रानुसार हिवाळी अधिवेशातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी 114.00 लाख रुपये वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला होता .
सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 च्या हिवाळी अधिवेशातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या 379.099 लाख रुपये इतक्या निधीपैकी रुपये 114.00 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्य पुर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखाशिर्ष अंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत .
सदरची तरतुद खर्च करण्याकरीता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनस्त सहायक निबंधक सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे .
सदरचा खर्च हा इतर कृषीविषयक कार्यक्रम , इतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना , नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी , अर्थसहाय्यक या लेखाशिर्ष खाली निधीचे खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 30 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..