Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Loan Free Scheme ] : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने राज्य शासनांवर विविध शेतकरी संघटना व विरोधी पक्षांकडून दबाव येत आहे . सदरची कर्जमाफीचा निर्णय हा तेलंगणा राज्य शासनाप्रमाणे सरसकट निर्णय घेण्याची मागणी होत आहे .

सरकार मार्फत व्यवसायीकांचे 10 लाख कोटी रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहेत , तर शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होवू शकत नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनांकडे मांडला आहे . कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य शासन देखिल सहानुभूतीपुवर्क असल्याचे , शिंदे सरकारने म्हटले आहेत . शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी शासन स्तरावर कोणत्या हालचाली सुरु आहेत , याबबात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे कि , कर्ज माफीबाबत राज्य सरकारडे विनंती करण्यात आलेली आहे , केंद्र शासनांच्या मदतीने राज्य शासन काही वाटा टाकुन रुपये 3 लाख पर्यंतचे कर्ज सरसकट माफ होऊ शकते का ? याची माहिती सरकार मार्फत गोळा करु लागले आहेत , कर्ज माफी बाबत शिंदे सरकार सहानुभुतीपुर्वक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले कि , सरकार मार्फत विविध योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल या बाबीकडे लक्ष दिले जाते आहे . तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणे धनंजय मुंडे यांनी टाळले .

कर्जमाफी केल्यास , विधानसभेत होणार विद्यमान सरकारला फायदा ? : जर विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास , आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये फायदा होईल . अन्यथा विरोधी पक्षांकडून कर्जमाफीचा मुद्दा नमुद करुन विधानसभा निवडणुक फायदा मिळवतील .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *