Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer conjection From light Bill , Anudan GR ] : महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांना दरवर्षी सवलतीच्या दरांमध्ये वीज पुरवठा करण्यात येत असते व त्याची प्रतिपुर्ती ही महाविरण कंपनीस अर्थसहाय्यक म्हणून राज्य सरकारकडून अदा करण्यात येत असते . आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत अनूसूचित जमाती घटक अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी कृषी पंप धारकांना वीज दरांमध्ये सवलत देण्यात येत असते .
सन 2023-24 या सालाकरीता सदर योजना अंतर्गत महावितरण कंपनीस अर्थसहाय्यक उपलब्ध करुन देण्याकरीता मुळ 100 कोटी व पुरवणी रुपये 91.17 कोटी अशी एकुण रुपये 191.17 कोटी रुपये इतकी तरतुद करण्यात आलेली आहे . सदर निर्णयानुसार सदर निधी वितरण करण्याची बाब विचाराधीन होती .
सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत अनुसुचित जमाती घटक अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी कृषी पंप धारकांना वीज दरांमध्ये सवलती देण्याकरीता रुपये 63,81,00,000/- इतका निधी महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहेत .
सदर शासन निर्णयानुसार मंजुर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम फक्त अनुसुचित जमाती या घटक अंतर्गत लाभार्थ्यांवरच वीज दरांमध्ये सवलतीपोटी खर्च होईल याची दक्षता विभाग स्तरावर उर्जा – 5 कार्यासनाने तसेच महावितरण कंपनीने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच ज्या उद्देशा करीता निधीचे मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच उद्देशा करीता सदर निधी उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महाविरण कंपनीची असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील महाराष्ट्र उद्योग व उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 04 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीप्रमाणे पाहु शकता …