Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer KCC Loan scheme ] : शेतकऱ्यांना आपल्या वैयक्तिक आर्थिक गरजा भागविण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात , कारण शेतकऱ्यांना शेतीची मशागत , खत खरेदी , बियांची खरेदी इ. कामांसाठी आर्थिक अडचण भासते , यामुळे कमी व्याजदरांमध्ये सरकारकडून कर्ज पुरवठा करण्यात येते .
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी क्रेडीट योजना सुरु करण्यात आलेली आहे , ज्यातुन शेतकऱ्यांना अत्यल्प व्याजदरांमध्ये कर्ज पुरवठा केला जातो , ज्याचे नाव किसान क्रेडिट कार्ड असे आहे . ज्यामुळे इतर वित्त संस्थाकडून शेतकऱ्यांचे कर्जातुन होणाऱ्या शोषणांपासून संरक्षण केले जाते . अनेक वेळा शेतकरी आपली जमीन खाजगी बँका / सावकारांकडे गहाण ठेवून पैसांची जुळवाजुळव करत असतो , यामुळे सरकारने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून ही योजना राबविण्यात आली आहे .
परंतु शेतकरी आपली जमीन केंद्र सरकारच्या सदर किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत गहाण ठेवून कमी व्याजदरांमध्ये कर्ज घेवू शकतो . या कर्ज योजनांस ग्रीन कार्ड असेही संबोधले जाते . सदरची योजना ही केंद्र सरकारमार्फत सन 1998 पासुन सुरु करण्यात आलेली आहे .
या योजनांच्या माध्यमातुन शेतकरी आपल्या जवळील बँकांमध्ये जावून आपल्या जमीनीची कागदपत्रे जमा करुन त्वरीत अल्प व्याजदरांमध्ये कर्ज घेवू शकतो .ही योजना अगोदर केवळ सरकारी बँकामध्येच उपलब्ध होती , परंतु सरकारच्या नविन धोरणांनुसार खाजगी बँका मार्फत देखिल कर्ज पुरवठा केले जाते .
कर्जाची रक्कम / व्याजदर : या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे 9 टक्के व्याजावर उपलब्ध होते , परंतु सदर कर्ज योजना अंतर्गत 2 टक्के इतके व्याजदर अनुदान म्हणून उपलब्ध आहे , तर 1 वर्षाच्या आत सदर कर्जाची रक्कम परफेड केल्यास , शेतकऱ्यांना 3 टक्यांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देखिल मिळते , म्हणजेच व्याजदर हा केवळ 4 टक्केच राहील . जे कि देशात इतर कर्जांपेक्षा सर्वात स्वस्त कर्ज पुरवठा आहे .