Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer instraction about other apps and link apps download ] : सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हाट्सॲप व इतर माध्यमातुन एपीके फाईल शेअर होत आहेत . ज्यातुन एपीके हे फाईल शेअर केली जात आहे , ज्यावर शेतकऱ्यांनी क्लिक करुन डाऊनलोड केल्यास , त्यांचे बँक खाते रिकामे होत आहेत .

मागील काही महिन्यांमध्ये असे 34 प्रकरणे उघडकीस आले आहेत , ज्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे . सदर एपीके या ॲपवर क्लिक करताच हे ॲप्स इंस्टॉल होते , त्यानंतर आपल्या मोबाईल वर विविध मेसेजेस येणे सुरुवात होते , ज्यामध्ये आपल्या लोकेशन , मायक्रोफोन तसेच कॅमेरा यांची परवानगी मागते . त्यानंतर सदर सर्व प्रकारचे मॅसेज हे एका विशिष्ट क्रमांकाला ऑटो पद्धतीने फॉरवर्ड केले जाते .

ज्यातुन आपली बँकींग डिटेल्स हॅक केली जाते , व आपले बँक खात्यामधील सर्व रक्कम विशिष्ट अज्ञात बँक खात्यात वळवली जाते . आतापर्यंत अशा प्रकारचे 34 जणांना लुटले आहेत .सदर ॲप्स डॉऊनलोड केल्याच्या नंतर आपणांस विविध अवॉर्ड मिळत असल्याचे मेसेज येतात , ज्यांमध्ये बँक डिटेल्स मागितले जाते , त्यामुळे आपले खात्याचा सर्व तपशिल त्यांच्याकडे हॅक केला जातो , व आपल्या खात्यातुन पैसे लंपास होवू शकता .

अशी घ्या काळजी : कोणत्याही लिंक अथवा फाईल वरुन ॲप्स डाऊनलोड करु नयेत , ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत Play Store /ॲपल स्टोअर च्या माध्यमातुनच ॲप्स डाऊनलोड करावेत . कोणत्याही इतर सोशल मिडीया ( टेलिग्राम , फेसबुक , व्हॉट्सॲप इ. ) वरील अनधिकृत लिंक / फाईल्स वर क्लिक करुन ॲप्स डाऊनलोड करु नयेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *