नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी वाटप ; GR निर्गमित दि.27.03.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer imp Shasan Nirnay About Nukasan Bharapai ] : राज्यांमध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबतचा शुद्धीपत्रक महसूल व वन विभागांकडून दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2020 ते 2022 या कालाधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालत्तेच्या नुकसानीकरीता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली एकुण रक्कम रुपये 10664.94 लक्ष ऐवजी रुपये 11239.21 लक्ष इतकी वाचावी अशी सुधारित प्रपत्र सदर शुद्धीपत्रकासोबत जोडण्यात आलेले आहेत .

सदरचा शासन शुद्धीपत्रक हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.137 /2024 /व्यय – 09 दिनांक 14 मार्च 2024 नुसार मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत .

सदर शासन निर्णयांमध्ये जिल्हानिहाय बाधित क्षेत्र व वितरीत करण्यात आलेली एकुण मदत निधी बाबतचा सविस्तर तपशिल शासन शद्धीपत्रकासोबत देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात महसुल व वन विभागांकडून दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment