Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ farmer id card news ] : ज्यांच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना आता शेतकरी ओळखपत्र दिले जाणार आहे , याकरिता सरकारकडून एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे .
ज्यांच्या नावे शेती आहे , अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer ID ) जी की आधारशी लिंक असेल , अशा स्वरूपातील एक युनिक (Unic ) ओळखपत्र दिले जाणार आहेत . ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे ? पिकांचा तपशील , बँक खात्याचा तपशील इत्यादी बाबी सदर ओळखपत्राच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे .
सदर शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी सरकारकडून ग्रामसेवक, तलाठी , कृषी सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आलेली असून , याकरिता विशेष मोहीम राबवली जात आहे . शेतकरी ओळखपत्र हे एक डिजिटल स्वरूपातील ओळखपत्र असणार आहे . ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत .
शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक बाबी : शेतकरी ओळखपत्र हे एक डिजिटल स्वरूपातील ओळखपत्र असल्याने , त्यात शेतकऱ्यांना पीक संरक्षण , जमिनीचे आरोग्य , भूजल पातळी , हवामान अंदाज या सारखी माहिती त्यामध्ये नोंद करावी लागणार आहे .
शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे : शेतकरी ओळखपत्र साठी शेतकऱ्यांना त्यांचा शेतीचा सातबारा , आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल क्रमांक इ. कागदपत्रे कृषी सहाय्यक, तलाठी , ग्रामसेवक यांच्याकडे जमा करावी लागणार आहेत .
शेतकरी ओळखपत्राचे फायदे : शेतकरी ओळखपत्र हे एक प्रकारची युनिक डिजिटल प्लॅटफॉर्म स्वरूपातील ओळखपत्र असल्याने , शेतकऱ्यांना विमा संरक्षण , अनुदान वितरण , मदत निधी तातडीने देण्यास सहाय्यभूत ठरणार आहे .