निवडणुका पुर्वीच शेतकऱ्यांना मोठी मदत निधी जाहीर ; शासन निर्णय निर्गमित ,GR दि.04.03.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer help Anudan Shasan Nirnay ] : राज्यातील शेतकऱ्यांना माहे डिसेंबर व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावस यामुळे शेती पिकांचे नुकसान या साठी मदत देण्यासाठी निधींचे वितरण करण्यास मान्यता देणेबाबत महसुल व वन विभागांकडून दिनांक 04 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांकडून अतिवृष्टी , पुर व चक्रिवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास , त्या हंगामाच्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येते , सदरच्या निर्णयान्वये माहे डिसेंबर , 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यात अवेळी पाऊस झाल्याने  पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता सदर शासन निर्णयानुसार 2467.37/- लक्ष ( अक्षरी – चोविस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास शासनांने मंजूरी दिली आहे .

खाली नमुद केल्याप्रमाणे , सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांच्या माहिती विहीत नमुन्यात तयार करुन ती संगणकीय प्रणालीवर भरुन सदर कार्यवाही एक महिन्यांमध्ये पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . निधींचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

त्याचबरोबर ज्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता मागील पावसाळी हंगामामध्ये यापुर्वी मदत दिली आहे , त्याच क्षेत्रातील त्याच  शेतीपिकांच्या नुकसानीकरीता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करण्याचे निर्देश सदर निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत . तसेच शासन निर्णय महसुल विभाग दि.27.03.2023 व दिनांक 01.01.2024 नुसार जिरायत पिके , तसेच बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान मदतीकरीता विहीत दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात महसुल व वन विभागांकडून दिनांक 04.03.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment