Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojna 17 installment ] : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर , केंद्रामध्ये महायुतीने सत्ता स्थापन केली आहे , यावेळी देशाचे पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतली . तर इतर 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली , नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा लाभदायक निर्णय जाहीर केला आहे .
पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता : देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना अंतर्गत 17 वा हप्ता आचारसंहितामुळे अदा करण्यात आलेला नव्हता , याबाबत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रति एकनिष्ठ दाखवत सदर किसान सन्मान योजनेचा सतरावा (17 वा ) हप्ता मंजूर करण्यात आला आहे . यामुळे देशातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळी आर्थिक फायदा होणार आहे .
नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत देशाची धुरा तिसऱ्यांदा सांभाळताना प्रथम शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे . या योजना अंतर्गत देशातील तब्बल 9.3 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे . सदर योजनेचा सतरावा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहेत . यापूर्वी सदर योजना अंतर्गत 16 वा हप्त्याचे पैसे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते .
शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजनेची अपडेट पाहण्याकरिता pmkisan.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ई – केवायसी त्याचबरोबर लाभार्थी यादी यामध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी , तसेच सदर योजनेअंतर्गत काही शंका असल्यास 1800-115-5525 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता .
ज्या शेतकऱ्यांनी ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे , अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार आहे . ज्यांनी आतापर्यंत E-kyc पूर्ण केली नाही , अशांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अदा केला जाणार नाही , यामुळे आपली ई केवायसी पूर्ण झाली आहे की नाही , याबाबतची अपडेट pmkisan.gov.in या संकेस्थळाला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासा .