Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Good News For pm kisan installment ] : भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे मिळून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा महायुती सरकारने पार केला आहे . यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होणार हे निश्चित झाले आहे .
मोदी यांच्या सत्ता स्थापनेनंतर मोदी सरकारकडून प्रथम शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 17 वा हप्ता अदा केला जाणार आहे . शेतकऱ्यांकडून सदर 17 व्या हप्त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहण्यात येत होती , अखेर शेतकऱ्यांची ही प्रतिक्षा संपली आहे . देशात आचार संहिता मुळे सदर 17 वा हप्ता बाकी होता , परंतु आज दिनांक 05 जुन पासुन आचार संहिता उठली असून …
किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही . 17 वा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पुर्ण केलेली आहे , फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम अदा केली जाणार आहे .
17 व्या हप्त्यापासून अनेक शेतकऱ्यांनी नविन आवेदन सादर केले आहेत , तर बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव ई-केवायसी पुर्ण नसल्याने , कमी होणार आहे . 16 व्या हप्त्यांमध्ये सदर सन्मान निधी योजना अंतर्गत 21,000/- कोटी पेक्षा अधिसक रक्कम अदा करण्यात आलेली आहे . सदरचा हप्ता हा दिनांक 15.11.2023 रोजी जारी करण्यात आलेला होता .
17 वा हप्ता कधी अदा करण्यात येणार ? : भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या विजयाच्या आनंदात शेतकऱ्यांचे / नागरिकांचे आभार मानण्यासाठी किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लवकरच 17 वा हप्ता अदा केला जाईल , म्हणजेच जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत सदर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे .