Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Crops Loan At 1% reduce Shasan Nirnay ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्य तरतुदीचे वितरण करणेबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1 टक्का व्याज दराने अर्थसहाय्य करणेबाबत राज्य शासनांच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 12 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या सहकार व पणन विभागाच्या दिनांक 17.05.2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला आहे . सदरच्या निर्णर्यानुसार केंद्र सरकारच्या धोरण नुसार शेतकऱ्यांना सात ( 7 ) टक्के दराने कर्ज पुरवठा करण्यात येत आहेत , त्या बँकांनी सात टक्के ऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के दराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनांचे धोरण आहेत , सदर प्रयोजन करीता 1 टक्के व्याज फरकाची रक्कम ही राज्य शासनांकडून संबंधित बँकाना वर्ग करण्यात येते .
राज्यतील शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँका , राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक बँका , तसेच सन 2023-24 पासुन खाजगी बँकांना देखिल या निर्णयाचा लाभ देण्यात येतो . चालु वर्षातील सन 2023-24 या वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्याकरीता 1 टक्का दराने अर्थसहाय्य योजना अंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
सदर निर्णयानुसार सन 2023-24 या वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्याकरीता 1 टक्का दराने अर्थसहाय्य योजना अंतर्गत 24251501 – 33 अर्थसहाय्य या लेखा शिर्ष खाली 2400.00 लाख रुपये अर्थसंकल्पीत निधी वितरण करण्यासाठी उपलब्ध असून त्यापैकी आता वित्त विभागाच्या मान्यतेने 720 लाख रुपये ( अक्षरी सात कोटी वीस लाख ) इतक्या निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सदर निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेला निधी हा संबंधित बँका / संस्थास वितरीत करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे व त्याची प्रत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सहाकार व पणन विभागांकडून दिनांक 12 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

