Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer crops insurance new update , News ] : पीक विमा 2024 साठी भरताना एक नविन मोठी महत्वपुर्ण सुचना समोर आलेली आहे . यामुळे सन 2024 करीता पिक विमाचा भरणा करताना सदर सुचनांचे पालन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणार आहे .

याता पीक विमाचा भरणा करत असताना शेतकऱ्यांनी आपल्या नावांमध्ये जर सातबारा वर वेगळा , आधारकार्ड वर वेगळा बदल असेल अशा वेळी सदरचे नावांमध्ये दुरुस्ती करुन घ्यावेत , जसेच की , बासाहेब – बाळू , ज्ञानदेव – ज्ञानेश्वर , सरुबाई – सरस्वती , चंपा – चंपाबाई , कासिम – काशिम , काशिराम – काशिनाथ अशा प्रकारच्या नावे आधारकार्ड वर वेगळे व सातबारावर वेगळे असल्यास , दुरुस्ती करण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत .

तसेच काहींचे सातबारावर आडनाव नाहीत अशांनी सातबारावर आपले आडनाव लावून घ्यावेत , तसेच वडीलांच्या नावांमध्ये थोडासा बदल असेल तरी सदरची दुरुस्ती करुन घेण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत  . जर नावांमध्ये बदल दिसून आल्यास , अशा वेळी सदरचे अर्ज अप्रुव्हल होणार नाहीत , सर्व ठिकाणचे नाव जर सारखेच असेल अशा वेळी सदरचे अर्ज अप्रुव्हल होईल .

यावेळी प्रशासनांकडून कोणतीही सहाय्य केले जाणार नाही , तर विम्यांपासून वंचित व्हावे लागेल . यामुळे आत्ताच दुरुस्ती करुन घेण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .सध्यस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने विम्यांची प्रणाली कार्यन्वित झाली असल्याने , सदर कागदपत्रांमधील थोडीशी देखिल चुकांमुळे अर्ज रद्द होण्याची शक्यता असल्याने आपले , नाव , वडीलांचे नाव , आडनावातील चुका असल्यास लवकरच दुरुस्ती करुन घ्यावेत .

यांमध्ये आपले आधार कार्ड , सातबारा व बँक पासबुक मधील नावे सारखीच असणे आवश्यक असणार आहे ,काही चुका असल्यास दुरुस्त्या करुनच विम्यांचा भरणा करावा , असे सुचित करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *