Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer 1% Loan anudan Shasan Nirnay ] : राज्य शासनाने राज्यामधील शेतकऱ्यांकरीता सहा ( 6 ) टक्के व्या दराने अल्प मुदत कालावधी करीता पीक कर्ज पुरवठा होण्याकरीता शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेण्यात आलेले आहेत . या शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका शेतकऱ्यांकरीता 7 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहेत , त्या बँकांनी सात टक्के ऐवजी शेतकऱ्यांसाठी 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करावेत असे राज्य शासनांचे धोरण आहेत .
या करीता 1 टक्के व्याज फरकाच्या रक्कमेचा आर्थिक भार हा शासनांवर आहे , सन 2006-07 पासून खरीब व रब्बी हंगाम मध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका त्याचबरोबर प्रादेशिक बँका व सन 2013-14 पासून शेतकऱ्यांकरीता 3,00,000/- रुपये पर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करण्याऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहेत .
सन 2023-24 या वर्षांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्जे पुरवठा करण्याकरीता एक टक्के व्याज दराने अर्थसहाय्यक या योजना अंतर्गत एकुण रुपये 242 कोटी इतका निधी आवश्यक असल्या कारणांने सन 2023-24 ची मंजूर अर्थसंकल्पीय तरतुद वगळता रुपये 218 कोटी इतक्या पुरवणी मागणी डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशानांमध्ये सादर करण्यात आले होते . सदर मागणी रुपये 218 कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली असून , सदर निधी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विराधीन होती .
सदरच्या निर्णयानुसार सन 2023-24 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करीता एक टक्के व्याज दराने अर्थसहाय्य ( 2425 1501 ) 33 अर्थसहाय्य या लेखाशिर्ष खाली सन 2023 च्या हिवाळी अधिवशात पुरवणी मागणी द्वारे मंजूर रुपये 218 कोटी रक्कमेच्या 50 टक्के म्हणजेच 109 कोटी एवढ्या निधीचे नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
या संदर्भात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
शेतीविषयक योजना , कृषी अपडेट विषयक अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून WhatsApp ग्रूप मध्ये जॉईन व्हा !